Chhagan Bhujbal On Manoj Jarange: मनोज जरांगेंचे भाषण म्हणजे केवळ माझ्यावर टीका, असे प्रत्युत्तर मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. बीडची जाळपोळ तुमच्या लोकांनीच केली. 20 जानेवारीपर्यंत ते शांत बसणार आहेत. तोपर्यंत ते हॉस्पीटलमध्ये राहतील. त्यांनी तब्येतीला संभाळावे असे ते म्हणाले. आरे म्हटलं तर कोणीतरी कारे म्हणणार आहे. कोणाला दुखावण्याची मला हौस नाही.मला माझी जबाबदारी समजत असल्याचेही भुजबळ म्हणाले. एकाच भाषणात विरोधाभास होणार नाही,याची काळजी जरांगेंनी घ्यावी. जरांगेंच्या मोठ्या दाव्यावर विश्वास ठेवू नका, असेही ते म्हणाले.  देशामध्ये जातगणना करा, त्यानंतर कोणत्या जातीची संख्या जास्त आहे हे कळेल असे ते म्हणाले. 


काय म्हणाले होते जरांगे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकार भुजबळांचे ऐकतंय, ते सोबत बाजाराची पिशवी घेऊन हिंडतात. त्यात कागद, मग कशाला बोंबलतो रे मग? अशा भाषेत जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधला. तुला म्हटलं होतं नको नादी लागू. मी बेकार आहे, आता कसा बारीक आवाज बोलतो. जरांगे साहेब म्हणतो असे जरांगे म्हणाले. 


मी म्हणलं डंगराला कशाला बोलायचं,पण हे येडपट बोलते, मग आपण सोडत नसतो, जर कुणी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला तर त्याला सुट्टी नाही, असे भाषेत त्यांनी भुजबळांवर टीका केली. 


शासनाला माझी विंनती आहे, येथे हजारो माता मावल्या लेकरांना घेऊन उन्हात बसल्यात.आमची एकच मागणी आहे. मराठा समाजाला आरक्षण, सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी. भुजबळांचे ऐकू नका. प्रत्येक राज्यातील मोठी जात असलेला समुदाय संपविण्याचा तुम्ही घाट घातलाय. पण सगळ्यांनी ठरवलं तर तुमचा सुपडा साफ होईल असे ते म्हणाले.