Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि सरकारविषयी केलेल्या वक्तव्यावर टीका करत सदर प्रकरणी एसआयटी चौकशी लागू करण्याची मागणी विधानसभेत आशिष शेलार यांनी केली. ज्यानंतर संसदीय लोकशाही जपणं ही सभागृहाची जबाबदारी असल्याचं म्हणत योग्य उपाय म्हणून या गंभीर घटनेच्या माध्यमातून राज्य किंवा देशाच चुकीचा संदेश जाणं धोक्याची बाब ठरु शकते. सदर प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता राज्य शासनाच्या वतीनं या प्रकरणी एसआयटी मार्फत सखोल चौकशीचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं. 


आदेशांचं पालन होणार- फडणवीस 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीच्या आदेशांचं पालन होईल असं आश्वासक वक्तव्य करताना आपण इच्छा नसताना या मुद्द्यावर बोलणार असल्याचं म्हणज मनोज जरांगे यांच्या वादग्रस्त वक्यव्यांसंदर्भात आपली मतं मांडली. 


'मी मराठा समाजासाठी काय केलं हे सांगण्याची गरज नाही. मराठा आरक्षण दिलं. सारथीसह विविध योजना सुरू केल्या. मला कुणाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. मी मुख्यमंत्री असेपर्यंत ते आरक्षण मी सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाचं आरक्षण टीकवलं होतं', असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


हेसुद्धा वाचा : मनोज जरांगेंच्या अडचणी वाढल्या! 'त्या' वक्तव्यांप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिले SIT चौकशीचे आदेश


मनोज जरांगे पाटील माझ्याविषयी जे काही बोलले त्याच्यामुळं मराठा समाज आज त्यांच्या नव्हे, तर माझ्या पाठीशी उभा राहिला असं म्हणत जरांगेंच्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्र्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. 


'आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो आणि लोकांच्या आई- बहिणी काढतो?' असा सवाल करत या साऱ्यामागं नेमका सूत्रधार कोण आहे हे शोधावच लागेल असा आग्रही सूर फडणवीसांनी आळवला. दगडफेकीमध्ये अटकेत असणारेच हे सर्व कोणी घडवून आणलं हे सांगत असतील, घरी जावून भेटणारे कोण आहे हे सांगत असतील तर आता हे षडयंत्र बाहेर येऊ लागलं आहे. मनोज जरांगेंना घरात जाऊन भेटणारे आहेत तरी कोण? असा जाहीर प्रश्न उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहापुढं केला. बीडची घटना विसरलात? असा प्रतिप्रश्न करताना फडणवीसांनी काही घटनांचा उल्लेख करत आंदोलनाच्या नावाखाली झालेल्या हिंसेकडे सर्वांचं लक्ष वेधलं. 


आपलं राजकारण कुठे चाललंय? 


'सध्याचं राजकारण कोणत्या स्तराला सुरुये? पैसा कुठून येतोय? हे सगळं बाहेर येणार आहे. समाजाचे तुकडे करणारे राजकारण नको. कोणीही जर कोणाच्या आई- बहिणीवरून अर्वाच्य शब्दांत बोलत असेल तर  तो विरोधी पक्षाचा किंवा सत्ताधारी पक्षाचा सदस्य असो देवेंद्र फडणवीस खुद्द तुमच्यासोबत उभा असेन. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्याशी मला काहीच घेणंदेणं नाही' असं फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं. त्यांच्या मागं असणारा बोलविता धनी शोधून काढा, अशीच मागणी त्यांनी केली.