मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न किचकट आहे. सरकारनं समिती नेमली आहे. तो निर्णय घाईघाईने करता येणार नाही. तो निर्णय कोर्टातंही टिकला पाहिजे. राणे समितीचा अहवाल दिला पण ते कोर्टात टिकला नाही. मराठा आंदोलन कोणत्याही एका पक्षाचं नाही आहे. सगळे पक्ष यात सहभागी आहेत. आरक्षणासाठी जे काम राहिलं असेल तर ते मी लक्षात आणून देईल. असं वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे.



राजकीय हेतूनं आंदोलन सुरु आहे असं मला वाटत नाही. मुख्यमंत्र्यांची सापाबद्दलची माहिती त्यांची आहे मला त्याची माहिती नाही. मुख्यमंत्र्यांच्या सापाच्या वक्तव्याचा आंदोलकांना राग आला आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल परिपूर्ण असायला हवा, नाही तर कोर्टात टिकणार नाही. मराठा समाज हा श्रीमंत लोकांचा समाज नाही. यातील गरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे. आमचे कार्यकर्ते मराठा आंदोलनात आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास उशीर होतो आहे. असं देखील सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे.