Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. वाहतूक व्यवस्था नियोजित करण्यासाठी पोलिसांनी अधिसूचना जारी केली आहे. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 44 हजार पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे. शिवाजी पार्क मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याने तेथील रस्ते दुपारी 12 वाजेपर्यंत बंद असणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पोलिसांनी तात्पुरत्या स्वरुपासाठी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली असल्याचं सांगितलं आहे. तसंच शिवाजी पार्क परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. शिवाजी पार्कात दरवर्षी प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पार पडतो. येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिवाजी पार्क आणि आजुबाजूच्या परिसरात ड्रोनबंदी घालण्यात आली आहे. 


वाहतूक व्यवस्थेत नेमके कोणते बदल?


- न. ची. केळकर रोड आणि केळुस्कर रोड एल. जे. रोड जंक्शनपासून दक्षिण आणि उत्तर जंक्शन वाहतूक बंद


- केळुस्कर रोड दक्षिण हा पूर्वेकडील वाहनांच्या वाहतुकीसाठी एकमार्ग असेल. सावरकर रस्त्यावरील वाहतूक या मार्गाने येण्यास परवानगी


- केळुसकर रोड उत्तरेकडील मीनाताई ठाकरे पुतळ्यासमोरून उजवे वळण हा पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी एक मार्ग असेल.


- एस. के. बोले रोड सिद्धिविनायक जंक्शन ते पोर्तुगीज चर्चपर्यंत वाहतुकीसाठी एक मार्ग असेल.


- सिद्धिविनायक जंक्शन ते येस बँक हा सावरकर रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील.


- सिद्धिविनायक जंक्शनकडून सावरकर रस्त्याने जाणारी वाहने बोले रस्त्याने उजवीकडे वळण घेऊन पोर्तुगीज चर्चकडे डावीकडे वळण घेतील.


- येस बंक जंक्शन ते सिद्धिविनायक जंक्शनपर्यंत वाहतुकीसाठी प्रवेश प्रतिबंधित आहे, वाहने येस बँकेकडे डावीकडे वळण घेऊन पुढे जातील.


- शिवाजी पार्क रोड क्र. ५, पांडुरंग नाईक रोड-राजा बडे चौकात उजवे वळण-एल. जे. रोड-गोखले रोडद्वारे दक्षिण मुंबईकडे जातील.


नो पार्किंग झोन


- केळुस्कर रोड (मुख्य, दक्षिण आणि उत्तर वहिनी)
- लेफ्टनंट कर्नल, दिलीप गुप्ते रोड केळुस्कर रोड (उत्तर) ते पांडुरंग नाईक रोड.
- पांडुरंग नाईक रोड (रस्ता क्रमांक ५)
- गडकरी चौक ते कोतवाल गार्डनपर्यंत एनसी केळकुर रोड, सेंट ज्ञानेश्वर रोड.