नव्या भरतीत मराठा समाजाला 16 टक्के जागा राखीव- मुख्यमंत्री
मराठा समाजासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
अमित जोशी, दीपक भातूसे, मुंबई : राज्य सरकारच्या होऊ घातलेल्या नव्या नोकरभरतीमध्ये मराठा समाजाला १६% जागा राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत दिली. सरकार लवकरचं ७२ हजार जागांसाठी नोकर भरती करणार आहे.मात्र उच्च न्यायालयाच्या निकालानंतर नोकरीतील हा अनुशेष भरणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये आंदोलन सुरु असून आज त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारनं नव्यानं होणारी ३५ हजार पदांची भरती प्रक्रिया थांबवावी अशी मागणी केली.
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे असं आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत स्पष्ट केलं. मागसवर्गीय आयोगानं आरक्षणासंदर्भातल्या अभ्यासाचा अहवाल लवकरात लवकर सादर करवा अशी मागणी केलीय., अहवाल सकारात्मक असेल, अशी अपेक्षा आहे असंही महसूल मंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं. त्याआधी बीडमध्ये सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनाचे पडसाद आज विधानसभेत उमटले. विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारनं नव्यानं होणारी ३५ हजार पदांची भरती प्रक्रिया थांबवावी अशी मागणी केली.