Eknath Shinde Nana Patekar : जवळपास तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणाला (Maharashtra Political Crisis) हादरा देणारी घटना घडली. ज्या महाराष्ट्रात शिवसेना (Shivsena) हा पक्ष ताठ मानेनं उभा होता त्याला खिंडार पडलं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) चाळीसहून अधिक आमदारांच्या साथीनं पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी बंडखोरी केली. संपूर्ण देशात या घटनेचीच चर्चा पाहायला मिळाली. शिंदे गटानं कोणत्याही पक्षात प्रवेश न करता आपला गट म्हणजेच खरी शिवसेना असल्याचा दावा ठोकला. दिवस उलटत गेले आणि आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) गट आणि शिंदे गट या दोघांनाही नवं नाव आणि नवी चिन्हं मिळाली. या साऱ्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आणि त्याचं चिन्हं, धनुष्यबाण मात्र गोठवले गेले. थोडक्यात या पक्षाची सर्वसामान्यांच्या मनात असणारी ओळखच दडपण्यात आली. सर्वसामान्य मतदारांच्या पक्षाशी असणाऱ्या भावनाही यामुळं दुखावल्या गेल्या. हाच मुद्दा खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्यासमोर तडफदार अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी उपस्थित केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमादरम्यान नानांनीच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांची मुलाखत घेत त्यांच्यावर काही वास्तवदर्शी प्रश्नांचा मारा केला. यावेळी दोन्ही नेत्यांनीही त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न केला.


समान नागरी कायद्यापासून ते अगदी फडणवीसांचं नानांशी असणारं नातं इथवर या मुलाखतीत चर्चा झाल्या. पण, टाळ्या पडल्या त्या मात्र शिवसेनेमध्ये फूट पडली आणि आमच्या घरात भांडणं झाली या नानांच्या वक्तव्यावर.


शिवसेनेत झालेल्या गटबाजीबाबत काय म्हणाले नाना ?


मतदार म्हणून आम्हाला किंमत आहे का? असा प्रश्न नानांनी केला आणि कार्यक्रमात टाळ्यांचा कडकडाट झाला. उत्तर कुणीही द्या असंच ते फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदेंना म्हणाले.


अधिक वाचा : '...म्हणून 2019 ला केलेली चूक सुधारायला अडीच वर्षे लागलीत', एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा!


नानांच्या या प्रश्चाचं उत्तर देत आमची किंमत तुमच्या भरवशावर ठरते असं उत्तर फडणवीसांनी दिलं. ‘तीन महिन्यांपूर्वी आम्ही जे केलं, तो मतदारांचा आदरच केला. 2019 ला जे होणं अपेक्षित होतं ते आम्ही केलं. मतदारांनी सेना-भाजप युतीला निवडून दिलं. त्याप्रमाणए सरकार स्थापन होईल असं वाटत असतानाच तसं झालं नाही. पण, आम्ही ते तीन महिन्यांपूर्वी केलं’, यावर प्रतिप्रश्न करत त्यासाठी अडीच वर्ष का लागली? अशी गुगलीही नानांनी टाकली. यावर प्रयत्न सुरु होता पण, तीन महिन्यांपूर्वी त्याला यश मिळालं अशा आशयाचं उत्तर दिलं.


शिवसेनेत आलेल्या दळाविषयी मनातील भावना व्यक्त करत नानांनी म्हटलं, ‘एकनाथराव, राष्ट्रवादी, समाजवादी, काँग्रेस सगळे वेगळे पक्ष. पण, शिवसेना विभागली गेल्यानंतर आमची घरंही विभागली गेली. माझे वडील किंवा भावंड, मुलं यांच्यामध्ये दोन गट पडले आहेत. हे प्रकरण आता तुमच्यापर्यंत मर्यादित न राहता ते वाढत गेलं आहे. त्याचं का. करायचं आम्ही? तुमच्यातली भांडणं कदाचित उद्या मिटतील आमच्यातल्या भांडणांचं काय? तळागाळात, गावागावात ही भांडणं सुरुयेत, पण आमच्यातल्या भांडणांचं काय करायचं?’, हा भाबडा प्रश्न नानांनी एक सर्वसामान्य मतदार म्हणून विचारला. उद्या तुम्ही या कुटनितींना राजकारणाचं नाव द्याल, असं म्हणत पक्षामध्ये माजलेल्या या दुफळीवर त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.