मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये खड्यांचं साम्राज्य, कलाकार संतप्त
नागरिकांसोबतच आता कलाकारांना देखील खड्यांचा मनस्ताप
मुंबई : सध्या खड्यावरून जोरदार रणकंदन माजत असताना मुंबई, ठाणेकरांच्या पाचवीलाच खड्डे पुजले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान कंत्राटदारांना या खड्यात गाडले पाहिजे अशी सणसणीत प्रतिक्रिया कोणा सर्वसामान्य माणसाने नव्हे तर चक्क मराठी कलाकारांनी दिली आहे. दरम्यान आता तरी खड्याकडे प्रशासनाने डोकावून पाहिले पाहिजे अशी आशा आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली मधील खड़यांमुळे नागरिकांसोबतच आता कलाकारांना देखील खड्याचा मनस्ताप होऊ लागलं आहे.
संगीतकार ह्रदयनाथ मंगेशकर यांनी डोंबीवली ला एका कार्यक्रमाला येताना रस्त्यावर पडलेल्या खड़यांमुळे यायला उशीर झाल्याची खंत बोलून दाखवली होती. तसेच कलाकार प्रशांत दामले यांनी देखील रस्तयाँवरील खड़यांवर नाराजी व्यक्त केली. ठाण्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पूर्व द्रुतगति मार्गावर अक्षरशः रसत्यांची चाळण झालिय. ठाण्यातील अंतर्गत रस्तयाँवर देखील खड्ढे पडलेत. दरम्यान कलाकारांनी प्रशानाच तीव्र शब्दात निषेद केलाय. आता तर मराठी कलाकारांनी चक्क सोसिएल मीडियाचा वापर करून लोकप्रतिनिधीचे आणि प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत.
सुप्रसिद्ध अभिनेत्री तसेच ठाणेकर म्हणून समजल्या जाणाऱ्या संपदा जोगळेकर अभिनेता विजू माने, मंगेश देसाई यांनी चक्क झी मीडियाच्या समोर आपली खंत व्यक्त केली. ठाण्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी खड्डे बुजवण्याचे आदेश दिले असले तरी खाड्यांचा सामना सर्वसामान्य जनतेसह कलाकारांना बसला आहे.