राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी अनुवाद नाही, विरोधकांचा सभात्याग
राज्य विधिमंळात आज (सोमवार, २५ फेब्रुवारी) राज्यपालांच्या अभिभाषणाच्या मराठी अनुवादावरून जोरदार गदारोळ पहायला मिळाला
मुंबई : राज्य विधिमंळात आज (सोमवार, २५ फेब्रुवारी) राज्यपालांच्या अभिभाषणाच्या मराठी अनुवादावरून जोरदार गदारोळ पहायला मिळाला
राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने आजपासून सुरूवात झाली. मात्र, राज्यपालांच्या अभिभाषणावेळी अनुवाद करणारा कर्मचारी वेळवर उपस्थित राहू शकला नाही. त्यामुळे राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी अनुवाद सभागृहाला उपलब्ध होऊ शकला नाही. या गोष्टीवर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेत सभात्याग केला.
दरम्यान, काही वेळानंतर राज्यापालांच्या अभिभाषणाचा मराठी अनुवाद उपलब्ध होऊ शकला नसल्याबद्धल मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी सभागृहाची माफी मागितली. दरम्यान, मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला करंटेपण उघड झाल्याचा तसेच, सरकार मराठी भाषेला दाबत असल्याचा विरोधकांनी आरोप केला.