राज्य सरकारचा मास्क सक्तीबाबत महत्त्वाचा निर्णय, पाहा काय झालं?
कोरोनाचा (Corona) जोर ओसरल्यानंतर महाराष्ट्रात मास्कचा वापर करणं हे ऐच्छिक करण्यात आलं. मात्र त्यानंतर देशातील अनेक राज्यात कोरोनाचा जोर वाढलाय.
सागर कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई : कोरोनाचा (Corona) जोर ओसरल्यानंतर महाराष्ट्रात मास्कचा वापर करणं हे ऐच्छिक करण्यात आलं. मात्र त्यानंतर देशातील अनेक राज्यात कोरोनाचा जोर वाढलाय. त्यामुळे राज्यात पुन्हा मास्क सक्ती करण्यात यावी, अशी कुजबुज सुरु होती. या मास्क सक्तीबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. (mask is not mandatory in maharashtra at present discussion in cabinet meeting)
राज्यात मास्क सक्ती तुर्तास तरी करण्यात येणार नाही, अशी चर्चा कॅबिनेटमध्ये करण्यात आली. मात्र रुग्ण संख्या वाढत राहिल तर मास्क सक्ती करावी लागेल, असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
तर दुसऱ्या बाजूला गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरावा, अगदी सक्ती नसली तरी, असा काही कॅबिनेट मंत्र्यांचा सूर या बैठकीत होता.