गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : बॉलिवूडचं माहेर असलेल्या अंधेरीतून (Andheri News) मोठी बातमी समोर आली आहे. अंधेरीत मोठी आग लागली आहे. या आगीत सिनेमाचा सेट भक्ष्यस्थानी पडला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. (massive fire broke out on set of a cinema at chitrakoot ground in dn nagar at andheri)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंधेरी पश्चिमेतील डीएन नगर इथं चित्रकूट मैदानावर सिनेमाचा सेट होता. या सेटला ही आग लागली आहे. आगीचे प्रचंड लोळ आजूबाजूच्या परिसरात पाहायला मिळतायेत. सुदैवानं आतापर्यंत या आगीत जीवितहाणीचं वृत्त आलेलं नाही. मात्र सेटला आग लागल्याने मोठं नुकसान झालंय. 



आग मोठ्या प्रमाणात पसरली आहे. त्यामुळे बघ्यांचीही एकच गर्दी झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.