मुंबई : केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात मुबंईत आझाद मैदानात (Mumbai Azad Maidan ) शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यात आला आहे. हा मोर्चा CAA, NRC विरोधात काढण्यात आला आहे. या मोर्चात एकूण ६५ संघटना सहभागी झाल्या आहेत. संविधान बचाओ, भारत बचाओ, अशा घोषणा देण्यात येत आहेत. फक्त मुस्लिम नागरिक नाही तर अन्य धर्माच्या संघटनाही या शांततापूर्ण आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीएए, एआरसी आणि एनपीआरला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. या आंदोलनत महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग आहे. देशभरात CAA, NRC विरोधात आणि समर्थनार्थ आंदोलन सुरु आहे.  



एनआरसी आणि सीएएचा मुद्दा सध्या भारतात गाजत आहे. यात वेगवेगळ्या विचारधारा आपापल्याप्रमाणे यांचा विरोध करत आहेत किंवा समर्थन करीत आहेत, पण मुद्दा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा विषय उचलून धरला आणि मुंबईत पाकिस्तान आणि बांग्लादेशींविरोधात मोर्चा काढला. एवढेच नाही तर मोदी सरकारला धारेवर धरणारे राज ठाकरे यांना या मोर्चात सीएए आणि एनआरसीचे समर्थनही केले.