मुंबई : गेल्या पाच महिन्यापासून ठप्प असेलेल्या मिनी ट्रेनची अमन लॉंज ते माथेरान शटल सेवा आज पासून सुरु होत आहे. आज सकाळी ८.४० वाजता अमन लॉजहून मिनी ट्रेन सुटणार असून माथेरानला सकाळी ८.५८ ला पोहोचणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा झालेल्या मुसळधार पावसात नेरळ ते माथेरान दरम्यानचा रेल्वे रूळ २२ ठिकाणी नादुरुस्त झालेला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने मिनी ट्रेनची सेवा बंद केली होती.


मुंबईच्या जवळ असलेल्या माथेरानची मिनी ट्रेन पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. गेल्या काही वर्षापासून अपघातांमुळे माथेरानची राणी वेळापत्रकाप्रमाणे रुळावर धावलीच नाही. गेल्या वर्षी दुरुस्तीनंतर ती रुळावर आली परंतु पुन्हा पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा रेल्वे रुळांचं नुकसान झालं आणि मिनी ट्रेन पुन्हा ठप्प झाली. 


खुशखबर ! माथेरानची राणी पुन्हा धावणार


माथेरानची राणी बंद असल्याने स्थानिक लोकांमध्येही चिंता होती. मिनीट्रेन बंद असल्याने त्याचा पर्यटनावरही विपरीत परिणाम होत होता. नागरिकांकडून ट्रेन सुरु करण्याची मागणी होत होती.  मिनी ट्रेनच्या दुरुस्तीदरम्यान अनेक चाचण्या घेण्यात आल्या. अनेक चाचण्यांनंतर आता माथेरानची राणी दिमाखात धावण्यास सुरु झाली आहे.