गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : ज्या बंडखोरांना परत यायचंय त्यांनी परत यावं, त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. आदित्य ठाकरेंची सध्या निष्ठा यात्रा सुरू आहे. आज आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची पश्चिम उपनगरांत निष्ठा यात्रा झाली. त्यावेळी ते बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भेटी लोकांचं प्रेम आणि विश्वास बघण्यासाठी आहे आणि शिवसैनिकांचं प्रेम आणि विश्वास उद्धव ठाकरे यांच्यामागे खंबीरपणे आहे. आमच्यावर वैयक्तिक राग असेल, पण तो राग मुंबईकरांवर व्यक्त करु नका, मुंबईविरोधी सरकार बनवू नका असं आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. 


ज्यांना परत यायचं आहे त्यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत आणि नेहमीच असणार पण जे मनाने तिकडे गेले असतील त्यांना तिकडे रहायचं असेल त्यांनी तिकडे आनंदात रहावं, त्यांच्याबद्दल आमच्या मनात काही नाही, पण दु:ख आहे की त्यांनी आमच्या पाठित खंजीर खुपसला, अशी भावना आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. 


अशा आमदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं जनता जो निकाल देईल तो आम्हाला मान्य असेल असं आव्हानही आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे.