Powai : पवईमध्ये एक कुटुंब आपल्या 6 वर्षांच्या मुलीला अरबी भाषा शिकवण्यासाठी मौलवीला बोलवायचे. रोज घरी येणारा हा आरोपी तिला वेगवेगळे टास्क द्यायचा आणि ते पूर्ण न झाल्यास तिच्या शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. आपण केलेलं कृत्य कुणी पाहत नसल्याच्या आवात टास्क वाढत गेले आणि मुलीच्या शरीराला होणारा वाईट स्पर्श अत्याचारात बदलला.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यावेळी लहान असल्याने आपल्यासोबत काय घडतंय याचा तिला पत्ताच नव्हता. आता ती मुलगी १७ वर्षांची झाली. गुड टच आणि बॅड टच काय हे तिला कळायला लागलं. १० वर्षांपूर्वी आपल्यासोबत काय घडलं हे तिला कळलं. तिच्या वर्तनात होणारा बदल पाहून आईची चिंता वाढली. आपल्या मुलीच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे आईने जाणून घेण्याचा प्रयत्न केले. मुलगी जेव्हा आईसमोर मोकळी झाली तेव्हा तिने संपूर्ण प्रकरण सांगितलं आणि आईची पायाखालची वाळूच सरकली.

आईने हा प्रकार वडिलांना सांगितला आणि त्यांनी वेळ न घालवता थेट पोलीस स्टेशन गाठलं. १० वर्षांपूर्वी आपल्या मुलीसोबत काय घडलं याचा संपूर्ण घटनाक्रम त्यांनी पवई पोलिसांना सांगितला आणि मौलवीविरुद्ध गुन्हा नोंदवला.

पवई पोलिसांनी संपूर्ण तपशील जाणून संबंधित पोलीस स्टेशनला कागदपत्रे पाठवली. तसेच प्रकरणाचा छडा अवघ्या चार तासांत लावून आरोपी मौलवी मोहम्मद अस्लम हाफीज याला पकडलं. आरोपीच्या विरोधात पोक्सो अर्थात बाल लैंगिक शोषण विरोधी कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


सदर यशस्वी कामगिरी मा. पोलीस आयुक्त, श्री. विवेक फणसाळकर, मा. विशेष पोलीस आयुक्त, श्री. देवेन भारती, मा. सह पोलीस आयुक्त श्री. सत्यनारायण चौधरी (कायदा व सुव्यवस्था), मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. परमजीत सिंह दहिया, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 10, मुंबई श्री. सचिन गुंजाळ, मा. सहा. पोलीस आयुक्त, साकीनाका विभाग, मुंबई श्री. सुर्यकांत बांगर, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र सोनवणे, पो.नि. प्रकाश कावळे (जनसंपर्क), स.पो.नि. संतोष कांबळे पोलीस हवालदार तानाजी टिळेकर, बाबू येडगे, पोलीस शिपाई सूर्यकांत शेट्टी इतर अधिकारी व पथक यांनी या प्रकरणाचा तपास केला.