रुचा वझे, झी मीडिया, मुंबई : सोनं हा भारतीयांचा विक पॉईंट आहे असं म्हणायला हरकत नाही. नव्या वर्षात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. सोन्यावरील जीएसटी सरकारने वाढवण्याचा विचार केला आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात सोनं स्वस्त होईल याची सुतराम शक्यता नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात सोन्याच्या दागिन्यांची भलतीच क्रेझ आहे. महिलांसोबत भारतीय पुरुषांनाही दागिने हौस आहे. सणसमारंभांना तर महिलांमध्ये वेगवेगळे दागिने परिधान करण्याची जणू शर्यंतच लागलेली आहे. पुरुषांमध्येही सोनं घालून फिरणारे कमी नाहीत. म्हणूनच आजही सोन्याचे दागिने घालून फिरणाऱ्या गोल्डमॅन लोकांची चर्चा होते. पण हे सोनं घालून हौसेमौजेनं फिरणं महागणार आहे. सरकार सोनं, चांदीसह मौल्यवान धातूंच्या खरेदीवरचा जीएसटी वाढवण्याच्या विचारात आहे.


जीएसटी ५ टक्क्यांवर नेल्यास त्यातून जीएसटीची महसुली तूट भागवता येईल असा सरकारचा अंदाज आहे. सरकारच्या या संभाव्य निर्णयामुळे नव्या वर्षात सोन्याचे भाव चांगलेच कडाडतील. लग्न सराई सुरु होतेय त्याला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सोनं महागाईत ग्राहकांमध्ये थोडीशी नाराजी आहे.


जीएसटी थेट ५ टक्क्यांवर नेल्यास एका तोळ्याला २०० वाढणार आहेत. सोनं महागलं तर ग्राहकांच्या संख्येवर त्याचा परिणाम होण्याची भीती दुकानदारांमध्ये आहे.


सोनं कितीही महागलं तरी भारतात त्याची खरेदी कमी होणार नाही असा सरकारचा अंदाज आहे. त्यामुळंचे महसुली तूट भरुन काढण्यासाठी सरकार सोन्यावरील जीएसटी वाढवण्याच्या विचारात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ग्राहक थोडेसे नाराज झाले आहेत.