मुंबई : सध्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोनावीर हे युद्ध जिंकण्यासाठी दिवस रात्र एक करत आहेत. अशा वेळी  मुंबईतील महापालिका रुग्णालयातील परिचारिकांचा हुरुप वाढवण्यासाठी त्यांनी नायर रुग्णालया भेट दिली. त्या रुग्णालयात परिचारीकेच्या वेषात पोहोचल्या. शिवाय त्यांनी मुंबईतील महापालिका रुग्णालयातील परिचारिकांशी संवाद साधला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर माजी परिचारिका आहेत. परिचारीकेच्या वेषातील त्यांचे फोटो सध्या फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांच्या या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी त्यांचे कौतुक करत आहेत शिवाय पालकमंत्री जयंत पाटील यांनी देखील ट्विटरच्या मध्यमातून त्यांचे आभार मानले आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करण्यासाठी मुंबई मनपाच्या महापौर. किशोरीताई पेडणेकर कोवीड योद्धा झाल्या आहेत. असं म्हणत त्यांनी  महापौर किशोरी पेडणेकर यांचं कौतुक केलं आहे. 


महापौर किशोरी पेडणेकर यांना पालिका कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या (191 G/S) वरळीतील गांधीनगर-डाऊन मिलमधील नगरसेविका आहेत. शिवाय त्यांनी परिचारिकेचे शिक्षण पूर्ण केल्यामुळे त्यांना याविषयी देखील त्यांना चांगला अनुभव आहे.