मुंबई : Mumbai Coronavirus Cases : कोरोनाची संख्या वाढत आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण चारपट वाढत आहेत. पण कोणीही घाबरुन जाऊ नये. बीकेसीत येऊन मी आढावा घेतला आहे. 950 रुग्ण हे बिकेसीत दाखल आहेत. यापैकी  280 रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत. एकही रुग्ण अतिदक्षता विभागात नाही, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.( Kishori Pednekar on Mumbai Coronavirus Cases) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीकेसीत 2 हजार 500  बेड्सची उपलब्धता आहे. 1 हजार 300  बेड्स विना ऑक्सिजनचे आहेत तर  890 ऑक्सिजनचे बेड उपलब्ध आहेत. आपल्याकडे बीकेसीत एकही आयसीयूतील पेशंट्स नाही. विरोधक लोकांना उकसवत आहेत, असा आरोप यावेळी महापौर पेडणेकर यांनी केला. 20 हजार आकडा आहे पण त्यात लक्षण नसलेल्यांची संख्या अधिक आहे.बेड आपल्याकडे आपल्याकडे उपलब्ध आहेत, असे त्या म्हणाल्या.



काळजी घेतली तर लॉकडाऊन दूर होऊ शकतो. विरोधकांनी संभ्रम निर्माण करु नये. मजुरांना विनंती आहे की मुंबई बाहेर जाऊ नये आणि नियमांचे पालन करावे. तसेच ज्यांचे लसीकरण झाले नसेल त्यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन महापौर पेडणेकर यांनी केले. 



दरम्यान, भाजप आमदार आशिष शेलार यांना धमकी आल्यावर प्रतिक्रिया देताना महापौर पेडणेकर म्हणाल्या, विरोधक आणि सत्ताधाऱ्यात वैचारीक मतभेद असले तरी कोणी असं जीवावर उठू नये, त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देणं चुकीचं महाराष्ट्रात चुकीची संस्कृती वाढू नये. आशिष दादाला धमकी येत असेल तर चुकीचे आहे. विकृत स्वभावाच्या लोकांनी हे थांबवावे , असे सांगत मी स्वत: पोलीस आयुक्तांशी बोलणार आहे, असे त्यांनी सांगितले.