मुंबई : आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस.. आठवडाभर धावपळीत असलेल्या मुंबईकरांसाठी हक्काच्या दिवसच म्हणावा लागेल. सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी घराबाहेर पडत असाल तर, ही बातमी पूर्ण वाचा. रेल्वेच्या वेळापत्रकाप्रमाणे नियोजन न करता घराबाहेर पडाल तर तुमच्यावर पस्तावण्याची वेळ येऊ शकते. तुमचा खूप वेळ रेल्वे स्टेशनवर लोकलची वाट पाहण्यात जाऊ शकतो. कारण, रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर दर आठवड्याप्रमाणे मेगाब्लॉक असल्याने रेल्वेचे आजचे वेळापत्रक जाणून घ्या.


मेगा ब्लॉक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर स. ११.१५ ते दु. ३.४५ पर्यंत मेगाब्लॉक असेल.


ब्लॉक कालावधीत या मार्गावरील लोकल सुमारे २० मिनिटे उशीराने धावतील. हार्बर मार्गावरील पनवेल ते नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी ११.३० ते दु. ४.३०  या वेळेत तर नेरुळ/बेलापूर-खारकोपर दरम्यान स. ११.३० ते दु. ४ वाजेपर्यत  अप आणि डाउन या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 


जम्बो ब्लॉक


पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप-डाउन धिम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी २.३५ वाजेपर्यत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.