महामुंबईत मेगाब्लॉक! हार्बर, मध्य, पश्चिम मार्गावर या वेळेत लोकल सेवा बंद
जाणून घ्या, रविवारी महामुंबईत कोणत्या रेल्वे मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे.
मुंबई: मध्य आणि हार्बर रेल्वेच्या उपनगरी मार्गावर देखभाल-दुरुस्तीसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल या दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी/नेरूळ स्थानकादरम्यान लोकल सेवा सुरू राहणार आहे. तर, पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वे (Main Line)
ठाणे ते कल्याण दरम्यान धिम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक
मध्य रेल्वे (हार्बर लाईन)
पनवेल ते वाशी (नेरुळ - बेलापूर - खारकोपर मार्गासह) दरम्यान सकाळी १०: ०० ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक
पश्चिम रेल्वे
वसई रोड ते विरार धिम्या मार्गावर रविवारी मध्यरात्री १२:३० ते पहाटे ४:३० पर्यंत ब्लॉक असणार आहे.