रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेने नेरुळ ते उरण नवीन मार्गिकेचा प्रकल्पास वेग मिळण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वे तर्फे नेरुळ इथं रविवार म्हणजेच २५ मार्च रोजी विशेष आठ तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे... मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे अप धिम्या मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यत जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे.
मुंबई : मध्य रेल्वेने नेरुळ ते उरण नवीन मार्गिकेचा प्रकल्पास वेग मिळण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वे तर्फे नेरुळ इथं रविवार म्हणजेच २५ मार्च रोजी विशेष आठ तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे... मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे अप धिम्या मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यत जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे.
मध्य रेल्वेवरील नेरूळ ते उरण या नवीन मार्गिकेच्या प्रकल्पासाठी यार्ड रिमॉ डेलिंग आणि नवीन रुट-रिले इंटर लॉकिंग (आरआरआय) यंत्रणेसाठी रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यत असा आठ तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. यामध्ये वाशी ते बेलापूरमधील वाहतूक सेवा बंद राहणार असून ठाणे ते वाशी ट्रान्सहार्बर सेवा नियमित स्वरुपात चालणार आहे.
रेल्वे मार्गिकेतील सिग्नलसाठी आरआरआय यंत्रणा आवश्यक ठरते. ही यंत्रणा कार्यान्वित करणे ही जटील असून त्या पूर्ततेनंतर नेरुळ ते उरण मार्गिका प्रत्यक्षात येण्यास वेग येणार आहे. हा ब्लॉक वाशी ते बेलापरमध्ये दोन्ही आणि तुर्भे आणि नेरुळ डाउन मार्गावर घेण्यात येणार आहे.
- डाउन हार्बर : वडाळ्यायाहून सुटणाऱ्या बेलापूर-पनवेल लोकल स. ९.०८ ते सायं. ५.३० आणि बेलापूर-पनवेल ते सीएसएमटी स. ९.४४ ते सायं. ५.५० पर्यत सेवा खंडीत राहणार आहे.
- ट्रान्सहार्बर : ठाण्याहून पनवेलसाठी जाणाऱ्या लोकल सकाळी ९.३९ ते सायं. ५.३४ आणि पनवेलहून ठाण्यासाठी जाणार्या लोकल स. ९.४८ ते ५.५७ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
- विशेष फेऱ्या : सीएसएमटी ते वाशी आणि पनवेल आणि बेलापूरसाठी विशेष फेर्या चालवल्या जातील. ठाणे ते वाशी ट्रान्सहार्बर सेवा नियमित स्वरुपात चालणार आहे.
- तसेच मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे अप धिम्या मार्गावर स. ११.२० ते दु. ४.२० पर्यत ब्लॉक आहे. कल्याणहून सुटणार्या सर्व अप स्लो/सेमी जलद लोकल कल्याण ते मुलुंडमध्ये स. १०.४८ ते दु. ४.१४ पर्यत अप जलद मार्गावर चालवल्या जातील. त्यानंतर या लोकल मुलुंडपासून पुन्हा अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील.
- तर पश्चिम रेल्वेवर बोरिवली आणि भाईदर स्थानकामध्ये स. ११ ते दु. ३ पर्यत मेगा ब्लॉक चालणार आहे. विरार ते गोरेगावपर्यत चालणार्या ब्लॉक मध्ये विरार-वसई ते बोरिवली-गोरेगाव आणि गोरेगाव ते वसई-विरार दिशेने जाणाऱ्या सर्व धिम्या लोकल या जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत.