Megablock : प्रवाशांनो...रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर देखभाल-दुरुस्ती, पाहा कुठे आहे मेगाब्लॉक
Mega Block on Sunday, March 26, 2023: मुंबईत आज रेल्वेकडून मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी तुम्ही घरातून बाहेर पडणार असाल तर एकदा रेल्वेचे वेळापत्रक चेक करा...
Mumbai Local Megablock on 26 March 2023 : आज रेल्वेच्या मार्गावरील देखभाल आणि दुरुस्तीसाठी तिन्ही मार्गावर (Railway Megablock) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. जर तुम्ही आज बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर एकदा लोकलचे वेळापत्रक नक्की चेक करा. नाहीतर प्रवाशादरम्यान तुमचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. रेल्वेचा हा मेगाब्लॉक मध्य रेल्वेच्या (central railway megablock) ठाणे ते कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील (harbpur railway megablock) कुर्ला ते वाशी अप-डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वे (western railway megablock) मार्गावर बोरीवली ते जोगेश्वरी पाचव्या मार्गिकेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवर
सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्ग
सीएलटी येथून सकाळी 9.30 ते दुपारी 2.45 या वेळेत सुटणाऱ्या जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिरा पोहोचतील.
तर सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 पर्यंत कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद लोकल कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या लोकल वेळापत्रकाच्या थांब्याव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबून पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील.
सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 पर्यंत कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद सेवा दिवा, मुंब्रा आणि कळवा
हार्बर रेल्वे
कुर्ला- वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत
सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 या वेळेत पनवेल/बेलापूर/वाशी येथून सुटणारी सीएसएमटीकडे जाणारी हार्बर मार्गावरील लोकल आणि सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलहून सुटणारी सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द असतील. तर ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला आणि वाशी-पनवेल स्थानकांदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालविण्यात येतील.
या ब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्सहार्बर मार्गे (ठाणे-वाशी/नेरुळ) सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.
पश्चिम रेल्वे
जोगेश्वरी ते बोरिवली पाचव्या मार्गिकांवर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत
या ब्लॉकदरम्यान जोगेश्वरी ते बोरिवली काही उपनगरीय लोकल गाड्या राहतील. या संदर्भात सविस्तर माहिती संबंधित स्टेशन मास्टर्सकडे उपलब्ध असेल.