मुंबईत रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
मुंबई शहर आणि उपनगरीय रेल्वे मार्गावर रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई : शहर आणि उपनगरीय रेल्वे मार्गावर रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रूळाच्या देखभालीसाठी हा मेगाब्लॉक असणार आहे. रविवार 16 जून रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवर डाऊन धीम्या, सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे अप- डाऊन तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल मार्गवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे मार्ग
मांटुगा ते मुंलुड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर सकाळी 11.20 ते दु. 3.50 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाउन धीम्या मार्गावरील वाहतूक डाउन जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहे.
हार्बर रेल्वे मार्ग
सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी 9.56 ते दुपारी 4.23 वाजेपर्यंत सीएसएमटी ते वांद्रे, अंधेरी, गोरगाव दरम्यानची अप आणि डाऊन मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.
सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर, वाशी सकाळी 9.53 ते दुपारी 2.44 अप- डाऊन वाहतूक बंद राहणार आहे. या प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला स्थानकातील प्लॅटफार्म क्रमांक 8 वरून पनवेलकरिता विषेश लोकल चालवण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्ग
चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 या वेळेत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे अप-डाउन जलद मार्गावरील वाहतुक अप-डाउन धीम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. तसेच काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.