मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, पुन्हा मेगाब्लॉक
Central Railway on Megablock : मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. मध्य रेल्वेवरील पाचव्या-सहाव्या मार्गासाठी आणखी 5 मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई : Central Railway on Megablock : मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. मध्य रेल्वेवरील पाचव्या-सहाव्या मार्गासाठी आणखी 5 मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवार-रविवार 8 ते 12 तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. ठाणे ते दिवा दरम्यान कामांसाठी मेगाब्लॉक आहे. (Megablock for works between Thane to Diva)
या मेगाब्लॉकमुळे लोकल, एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते दिवा या सहाव्या मार्गासाठी 72 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला. आता याच मार्गावरील किरकोळ कामांसाठी 8 ते 12 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
सहाव्या मार्गाच्या किरकोळ कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. मात्र, या मेगाब्लॉकचा परिणाम लोकल, एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार आहे.