मुंबई: सुट्टीचा आनंद आणि कोसळणाऱ्या पावसांच्या सरी यांचा आनंद घेण्यासाठी तुम्ही जर घराबाहेर पडायचा विचार करत असाल तर जरा थांबा. आगोदर रेल्वेचे वेळापत्रक पाहा आणि त्यानंतरच घराबाहेर पडा. कारण रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. एकाच दिवशी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असल्यामुळे मुंबईकरांची काहीशी अडचण होऊ शकते. म्हणूनच जाणून घ्या कोणत्या मार्गावर किती वाजता असणार आहे मेगाब्लॉक? 


मध्य रेल्वे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेवर विद्याविहार ते भायखळा दरम्यान अप धीम्या मार्गावर हा ब्लॉक असेल. सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत मध्य रेल्वेवर हा ब्लॉक घेण्यात येईल.


पश्चिम रेल्वे


पश्चिम रेल्वेवर माटुंगा रोड ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दु. २.३५ वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी माटुंगा रोड ते मुंबई सेंट्रल अप-डाउन जलद मार्गावरील लोकल अप धीम्या मार्गावरुन चालविण्यात येणार असून काही अप-डाउन ट्रेनही रद्द करण्यात येणार आहेत.


हार्बर रेल्वे


हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत मेगा ब्लॉक चालणार आहे.