मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरूस्ती आणि देखभालीसाठी मध्य रेल्वे मार्गावरील मेन लाईन आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेन लाईनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहेत. 


मेन लाईनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी 10.30 ते 3.30 वाजेपर्यंत दुरूस्तीची कामं करण्यात येणार आहेत. तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत दुरस्तीची कामं करण्यात येणार आहेत.