मुंबई : मध्य रेल्वेवर उद्या दोन विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील सेवा किमान सहा तासांसाठी बंद असतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेवरील वाहतुकीस अडथळे ठरणा-या तीन रेल्वे फाटकांपैकी ठाकुर्ली येथे उड्डाणपूल बांधण्याचं काम उद्या सुरु केलं जाणार आहे. तसेच अंबरनाथ-बदलापूरमधील पुलाच्या पुनर्बांधणीसाठी हे विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील सेवा सहा तासांसाठी बंद ठेवली जाणार आहे.


यातील पहिला ब्लॉक हा कल्याण-डोंबिवली दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 9:15 ते दुपारी 3:15 पर्यंत असेल तर दुसरा ब्लॉक हा अंबरनाथ आणि वांगणीतील अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 9:15 ते दुपारी 2 वाजेपर्यंत  असेल.


या ब्लॉक दरम्यान दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद असेल. शिवाय लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीतही बदल केले जाणार आहेत त्यामुळे गरज असेल तरच प्रवास करा असं आवाहान रेल्वे प्रशासनानं प्रवाशांना केलंय.