मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर कुर्ला ते सायन स्थानकांदरम्यान रोड ओव्हर पुलाचा गर्डर टाकण्यासाठी आजरात्री ब्लॉक घेण्यात आला आहे. तर सकाळी १०.५० ते दुपारी १२.५० वाजेपर्यंत आसनगाव ते कसारा दरम्यान ओव्हरहेड वायरचे जाळे टाकण्याकरिता अप-डाउन मार्गावरील लोकल वाहतूक बंद असणार आहे. मुलुंड ते माटुंगा दरम्यान डाऊन धिम्या मार्गावर ओव्हरहेड वायर, सिग्नल तसेच इतर तांत्रिक कामांसाठी सकाळी ११.३० पासून चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्जत स्थानकांतील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील झाड कापण्यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे ठाणे स्थानकांतून सुटणाऱ्या १०.४८ आणि १२.०५ लोकल, कर्जत स्थानकांतून सुटणारी १३.२७ कर्जत-ठाणे आणि १३.५७ कर्जत-सीएसएमटी लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. 


हार्बरमार्गावर कुर्ला-वाशी दरम्यान रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्तीकरिता सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० या काळात ब्लॉक घेण्यात आला आहे. सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल दरम्यान अप व डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल ते वाशी आणि कुर्ला ते सीएसएमटी दरम्यान विशेष लोकल फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. 


पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते गोरेगाव दरम्यान अप-डाउन धिम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यत जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे.