मुंबई : औरंगाबादच्या कोरोना सेंटरमधीस डॉक्टरने महिला रुग्णाचा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. या अति प्रसंगाचे पडसाद विधान भवनातही उमटले आणि विधान भवनात यावरून गदारोळ झालेला पाहायला मिळाला. या घटनेची गंभीर दखल घेत डॉक्टरला बडतर्फ केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधान भवनात या मुद्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रश्न उपस्थित केले. देवेंद्र फडणवीस यांनी 'सरकारच्या कोविड सेंटरमध्ये आणखी महिलांवर किती अत्याचार होणार? कोविड सेंटरचे SOP कधी मिळणार?' असे सवाल केले आहेत. अजून सरकारला किती महिलांवर अत्याचार झालेले पाहायचे आहेत? असे खडेबोल देखील लगावले आहेत. 


याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. घटनेची माहिती मिळताच डॉक्टरला बडतर्फ केलं आहे. त्याचप्रमाणे या घटनेची चौकशी करण्यास सांगितलं आहे. महत्वाचं बाब म्हणजे या घटनेत महिलेने पोलीस तक्रार करण्यास मनाई केली आहे. आपलं नाव कुठेच येऊ नये? अशी मागणी देखील केली आहे. तसेच डॉक्टर आणि महिलेचा नवरा हे दोघं मित्र आहेत. त्यामुळे हे प्रकरण थोडं वेगळं असल्याचं देखील उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. (धक्कादायक बातमी | कोरोना सेंटरमध्ये डॉक्टराचा महिलेवर बलात्काराचा प्रयत्न) 


कोरोना सेंटरमध्ये डॉक्टरांने रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. औरंगाबाद शहर पदमपुरामधल्या कोरोना उपचार केंद्रावर ही घटना घडली. घटनेनंतर रुग्णांच्या संतप्त नातेवाईकांनी रूग्णालयात घुसून डॉक्टरला बेदम मारहाण केली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी दिलेत.


संबंधित डॉक्टर तिचा फोन नंबर घेऊन दररोज महिलेला फोन करुन त्रास द्यायचा असाही आरोप या महिलेने केलाय. बुधवारी सुट्टी देण्याच्या नावाखाली या महिलेला केबिन मध्ये बोलावलं आणि या डॉक्टरने शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर सगळा राडा घडला. दरम्यान महिलेने बदनामीपोटी पोलिसात तक्रार दिली नाही. मात्र महापालिका आयुक्तांना सगळं प्रकार सांगितला. त्यानंतर त्या डॉक्टरला बडतर्फ करण्यात आलंय. मात्र कोरोना केंद्रावर ही महिला सुरक्षित नाही हे धक्कादायक  म्हणावं लागेल.