अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई : सोशल मीडियावर सध्या 'हॅश टॅग मी टू'ची चर्चा आहे. याचीच दखल मुंबई पोलिसांनाही घ्यावी लागलीय.


#MeToo


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर 'हॅश टॅग मी टू' सध्या ट्रेंडिंग आहे. या हॅश टॅगच्या माध्यमातून आपल्यावर झालेल्या अत्याचाराला पीडित सोशल मीडियावर वाचा फोडत आहेत. यांत सेलिब्रिटींसह अनेक महिलाही आहेत. याची देशभरातल्या पोलिसांनी दखल घेतलीय. अशी अत्याचाराची एखादी घटना घडली असल्यास समोर येऊन संपर्क करा आणि पीडितांना मदत करण्यात येईल, असं आवाहनही पोलिसांनी ट्विटरवर केलंय.


कुर्ल्यातील दोन घटना


मात्र कुर्ल्यातील पीडित मुलगी समोर येऊनसुद्धा तिला अद्याप मदत मिळालेलीच नाही. बलात्कार पीडितेला संरक्षण देण्यासाठी कोर्टाकडून सूचना असतानाही पीडितांच्या नातेवाईकांवर जीवघेणा हल्ला तर कुर्ला नेहरूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका युवकाने युवतीची छेडछाड करत भर रस्त्यात केस ओढून मारहाण करत धारदार शस्त्राने नाकावर केलेला वार... ही सर्व घटना बाजूच्या इमारतीतील सीसीटीव्हीत कैद झाली होती. मुलीच्या नाकावर मार लागल्याने ती जखमी झाली असून नाकाचे हाड तुटले आहे.


आरोपींवर कारवाई


ही घटना १७ आक्टोबरला घडली होती. पीडित मुलीने तक्रार दिल्यावर नेहरूनगर पोलिसांनी आरोपी इम्रान शेख याला अटक केली खरी मात्र साधा गुन्हा नोंद केला आणि आरोपी जामिनावर सुटला. प्रसार माध्यमांनी हा प्रकार उचलून धरल्याने पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा इम्रानला अटक केली असून त्याच्यावर मारहाण 'पोस्को' अंतर्गत कारवाई केली.


संरक्षण यंत्रणेवरचा विश्वास उडाला?


एकीकडे पोलीस पुढे येऊन तक्रार करा आवाहन करीत आहे तर दुसरीकडे कुर्ल्याची घटना ताजी आहे. काही महिन्यांपूर्वी पवई हिरानंदानी इथं परदेशी महिलेचा एका विकृत माणसानं विनयभंग केला. त्यातील आरोपीला अटक करण्यात आली. याच आरोपीनं अशा प्रकारचं कृत्य अनेकदा केल्याचं कबूल केलंय... मात्र कुणीही पीडित महिला पुढे आल्या नाहीत. यावरुन मुंबई पोलिसांवर आधी विश्वास नव्हता. जो आजही नाही असंच म्हणायचं का?