निसर्गाची हानी होत असेल तर मेट्रो ३ साठी विरोध कायम- उद्धव ठाकरे
मेट्रो-तीनवरून भाजप आणि शिवसेनेत धूसपूस सुरूच आहे. आरेबाबत अजून समाधान नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलीय.
मुंबई : मेट्रो-तीनवरून भाजप आणि शिवसेनेत धूसपूस सुरूच आहे. आरेबाबत अजून समाधान नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलीय.
आरेचा दौरा करणार, पहाणी करणार आणि मग मत व्यक्त करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. निसर्गाची हानी होत असेल तर शिवसेनेचा विरोध कायम असेल असा इशाराही द्यायला उद्धव ठाकरे विसरले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी आज मेट्रो 3ला भेट दिली. आझाद मैदान इथं मेट्रो 3चं काम सुरु असून त्याठिकाणी जाऊन उद्धव ठाकरे यांनी कामाचा आढावा घेतला. यावेळी सेनेचे मंत्री, नेते आणि मेट्रो 3च्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.