मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे चौथ्या टप्प्यांतर्गत गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठीची सोडत आज सकाळी ११ वाजता वांद्रे येथील म्हाडाच्या मुख्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. बॉम्बे डाईंग टेक्सटाईल मिल, बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल व श्रीनिवास मिलच्या जागांवर उभारण्यात आलेल्या ३ हजार ८९४ सदनिकांसाठी ही सोडत असेल. या वेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित राहतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गिरणी कामगारांना निम्या किमतीत घरे मिळणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगार शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे. १ मार्च २०२० पासून गिरणी कामगारांच्या घरांची सोडत काढण्यात येणार आहे. स्वस्तात घरे देण्याचा निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यामुळे गिरणी कामगारांना आता साडेनऊ लाखांतच घर मिळणार आहे. 


१ मार्चला ३०८५ घरांसाठी सोडत निघणार, २२० चौरस फुटांचे घर मिळणार


१ एप्रिल रोजी २२१७ घरांची सोडत निघणार, पनवेलच्या कोन गावात घरे, ३२० चौरस फुटांचे क्षेत्रफळ


गिरणी कामरांच्या घरांची किंमत वाढून १८ लाख रुपये होणार होती. मात्र ही गिरणी कामगार एवढी महाग घरं घेऊ शकत नाही. यासंदर्भात गिरणी कामगारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. आता मुख्यमंत्र्यांनीच घर साडेनऊ लाखांत उपलब्ध होतील, असे म्हटले आहे.