Mhada Lottery 2023 : मुंबईत असणार हक्काचं घर; म्हाडाकडून शे- दोनशे नव्हे तब्बल 8000 घरांची सोडत
Mhada Lottery 2023 : तुम्हीही स्वत:च्या घरासाठी पैशांची जुळवाजुळव करताय का? ही सोडत तुमच्यासाठीच. पाहा म्हाडाच्या नव्या प्रकल्पांमधील इमारती आणि नव्या घरांमध्ये काय सुविधा असतील...
Mhada Lottery 2023 : (Dream Home) स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. वयाच्या अमुक एका टप्प्यावर आल्यानंतर ते स्वप्न साकार करण्यासाठी मग पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी जीवाचास आटापिटा सुरु होतो. प्रचंड मेहनत घेण्यासाठीच प्रत्येकजण पुढे सरसावत असतो. आवडीनिवडी दूर सारून या घरासाठी पैशांची जुळवाजुळव करत असतो. अशा प्रत्येकासाठीच (MHADA Housing) म्हाडा म्हणजे एक मोठा दिलासा. मनाजोग्या ठिकाणी खिशाला परवडेल आणि आपल्या उत्पन्नामध्ये (Income belt ) बसेल अशा दरांत म्हाडाकडून घरं उपलब्ध करून दिली जातात. त्यामुळंच या म्हाडाच्या सोडतीकडे सर्वांच्याच नजरा असतात.
मार्च महिन्यात येणार नवी सोडत... (MHADA March Lottery 2023)
पुणे मंडळामागोमाग म्हाडाच्या कोकण (Konkan) आणि (Mumbai) मुंबई मंडळाकडून प्रत्येकी 4 हजार म्हणजेच दोन्ही मिळून 8 हजार घरांसाठी सोडत निघणार आहे. मुंबई मंडळातील घरांमध्ये 4 हजार घरांचा समावेश आहे. त्यापैकी 2600 घरं अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटांसाठी असून, ती गोरेगाव (Goregaon) येथील पहाडी भागात असतील. या घरांची किंमत साधारण 35 लाख रुपये इतकी असेल. म्हाडाच्या सोडतीबाहेर याच घरांची किंमत जवळपास 70 लाख रुपये इतकी आहे.
हेसुद्धा वाचा : Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या घरासाठी नोंदणी करायचीये? पाहून घ्या नवी उत्पन्नमर्यादा
कोकण मंडळाकडून ठाणे, वसई, विरार, पालघर, नवी मुंबई आणि रायगडमध्ये घरं उपलब्ध असतील. तर, मुंबई मंडळातर्फे गोरेगाव पहाडी भागात घरं उपलब्ध असतील.
घरांमध्ये कोणत्या सुविधा असणार?
म्हाडाच्या मार्च महिन्यात येणाऱ्या सोडतीमध्ये अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी घरं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामध्ये बहुतांश सुविधा देण्यात येतील. शिवाय मुंबईत असणाऱ्या काही भागांतील घरांचा समावेशही याच सोडतीमध्ये असेल.
2025 मध्ये म्हाडाची आणखी एक सोडत...
2025 मध्ये म्हाडाकडून गोरेगाव पहाडी भागात आणखी एक खास सोडत जारी केली जाणार आहे. जिथं 35 मजली इमारतीचा गृहप्रकल्प साकारण्यात येईल. यामध्ये 35+3 मजले अधिक पोडियम पार्किंगची सोय असणारी इमारत असेल. इथं मध्यम उत्पन्न गटासाठी साधारण 800 चौरस फुट, तर उच्च उत्पन्न गटासाठी 960 चौरस फुटांची घरं असतील.
इथं इमारतींना सज्जा, स्विमिंग पूल, व्यायामशाळा, इलेक्ट्रीक वेहिकल चार्जिंग स्टेशन अशा सुविधा असतील. म्हाडाच्या आतापर्यंतच्या इतिहासात या सुविधा असणारा हा पहिलाच प्रकल्प असेल.