Mahada lottery 2023 : अखेर म्हाडाच्या (MHADA Lottery 2023 Mumbai Date) मुंबईतील घरांसाठी अर्जदारांची अंतिम यादी जाहीर झाला आहे.  मुंबईतील 4082 घरांसाठी 1 लाख 20 हजार 144 अर्ज पात्र झाले आहेत. या यादीत आपलं नाव बघून असंख्य मुंबईकरांच्या हक्काचं आणि  स्वत:चं घराचं स्वप्न पूर्ण होण्याची आशा पल्लवित झाली आहे. तुम्ही अजूनही ही यादी पाहिली नसेल तर मुंबई मंडळाच्या सदनिका विक्री सोडतीत सहभाग घेणार्‍या पात्र अर्जदारांची सूची म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही पाहू शकणार आहात. (mhada lottery 2023 mumbai 4082 lottery date latest updates Mumbai MHADA Housing Lottery Result 2023)


आता मुंबईकरांना प्रतीक्षा सोडतीची 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्हाडाकडून हे सांगण्यात आलं की, 2175 अर्ज हे विविध कारणांमुळे अपात्र ठरले आहेत. या अर्जदारांचे अर्ज अपात्र ठरले आहेत, त्यासंदर्भात म्हाडाकडून महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. या अर्जदारांनी अनामत रकमेचा परतावा म्हाडा लवकरात लवकर करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता म्हाडासाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांना प्रतीक्षा आहे ती सोडतीची...यासंदर्भातही सोडतीची तारीख आणि स्थळ म्हाडाकडून लवकरच जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही सोडत होण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे. 


मुंबईतील 'या' विभागासाठी इतके अर्ज


प्रधान मंत्री आवास योजना 


या योजनेत 1947 घरांचा समावेश असून ही घरं पहाडी गोरेगाव इथे आहेत. या घरांसाठी 22 हजार 472 अर्ज म्हाडाला मिळाले आहेत. 


उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गट


या गटामध्ये म्हाडाकडून 843 घरं उपलब्ध आहेत. त्यासाठी 28 हजार 862 मुंबईकरांचे अर्ज म्हाडाला मिळाले आहेत. या गटातील कन्नमवार नगर विक्रोळीमध्ये 415 घरांसाठी सर्वाधिक अर्ज मुंबईकरांनी केले आहेत. 


अल्प उत्पन्न गट


या गटातर्गंत 1034 घरांसाठी 60 हजार 522 अर्ज म्हाडाला मिळाली आहे. तर पहाडी गोरेगाव परिसरातील 416 घरांसाठी सर्वाधिक अर्ज प्राप्त झाली आहेत. 


हेसुद्धा वाचा - आता संधी सोडू नका! म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 'या' घरांसाठी पुन्हा सोडत


मध्यम उत्पन्न गट


या गटातील 138 घरांसाठी 8395 अर्ज म्हाडाकडे आली आहे. या गटाची उन्नत नगर गोरेगावमधील घरांसाठी सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. 


उच्च उत्पन्न गट



या गटामधील 120 घरांसाठी 2068 अर्ज म्हाडाला मिळाली आहे. तर शिंपोळी कांदिवली पश्चिम मुंबईकरांनी सर्वाधिक पसंती दिली आहे.