Mhada Lottery 2023: अर्ज भरण्याआधी पाहून घ्या कसं दिसतंय म्हाडाचं घर; VIDEO VIRAL
Mhada Lottery 2023 in Marathi : लवकरच म्हाडाची लॉटरी निघणार आहे. सध्या हजारोने अर्जदार नोंदणी प्रक्रियेत लागले आहेत. गोरेगावमधील 2,683 घरांसाठी मार्चमध्ये लॉटरी लागणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी या घराची पहिली झलक आम्ही आणली आहे.
Mhada Lottery 2023 Goregaon Home Video : अनेकांचे घराचे स्वप्न लवकरच (mhada lottery 2023 mumbai) पूर्ण होणार आहेत. कारण मुंबई म्हाडाची लॉटरी मार्चमध्ये (mhada lottery 2023 in goregaon) निघणार आहे. सर्वाधिक 2,683 घरे ही गोरेगावच्या टेकडीमध्ये असून कन्नमवार नगर, वांद्रे, बोरिवली, मागाठाणे इथेल्याही घरांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु (mhada lottery 2023 registration) झाली आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येने मुंबईकर कागदांची जुळवाजुळव आणि नोंदणी करण्यात लागले आहेत. त्यात म्हाडाकडून अजून एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. (mhada lottery 2023 mumbai application form online date)
सिद्धार्थनगरमधल्या म्हाडा विजेत्यांसाठी गूडन्यूज (MHADA winners in Siddharthnagar Good news)
गोरेगावच्या सिद्धार्थनगरमधील म्हाडा विजेत्यांसाठी खूशखबर आहे... 2016च्या सोडतीतील विजेत्यांच्या घरांची प्रतीक्षा लवकरच संपणारेय. 306 घरांच्या अर्धवट बांधकामाला मंडळाकडून सुरुवात करण्यात आलीय. या कामानं आता वेग घेतलाय. पुढील 6 महिन्यांत दिवाळीच्या आधी काम पूर्ण करत विजेत्यांना घरांचा ताबा देण्याचं मंडळाचं नियोजन आहे. (mhada lottery 2023 mumbai application form online date registration mhada Home viral Video Trending Video on Social media )
घराची पहिली झलक (Goregaon Home Video)
प्रत्येकाला वाटतं आपलं हक्काचं घरं असावे. यासाठी म्हाडा आणि सिडको यांनी सर्वसामान्यांसाठी बजेट फ्रेंडली त्यांचा अवाक्यातील घरं आणली आहेत. गोरेगावमध्ये म्हाडा भूखंड-अ आणि भूखंड-ब वर दोन प्रकल्प उभारत आली आहेत. लिंक रोडवरील मेट्रो स्टेशनजवळील प्लॉट-ए मधील प्रकल्पात इकॉनॉमी वीकर विभागात (EWS) प्रत्येकी 23 मजल्यांच्या सात इमारती आहेत. तर, एसव्ही रोडजवळील प्लॉट-बी वरील 4-4 इमारती EWS आणि LIG (लोअर इन्कम ग्रुप) च्या आहेत. सोशल मीडियावर गोरेगावमधील म्हाडाच्या घराची पहिली झलक तुम्हाला घर बसल्या पाहता येणार आहे.
गोरेगावमधील 2BHK फ्लॅटची झलक दाखविण्यात आली आहेत. या घराची किंमत 75 lakh (house rates) सांगण्यात आली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील s1nghvarun या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हे घर पाहून अनेकांना म्हाडाचं अर्ज भरण्याची नक्कीच इच्छा होईल.