MHADA Lottery 2024 : मुंबईत हक्काचं आणि त्याहूनही स्वत:चं घर असावं असं या शहरात येणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न असतं. याच स्वप्नांना बळ देण्याचं काम करतात म्हाडासारख्या संस्था. मुंबईत स्वप्नांच्या घरासाठी प्रयत्न करणाऱ्या अशाच अनेक इच्छुकांसाठी म्हाडानं नुकतीच एक गृहयोजना जाहीर केली. अॅन्टॉप हिल, गोरेगाव, विक्रोळीतील कन्नमवार नगर या भागांमध्ये असणाऱ्या सदनिकांसाठी म्हाडानं ही गृहयोजना जाहीर केली असून, त्यासाठी अर्जनोंदणी प्रक्रियासुद्धा सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार म्हाडाच्या घरासाठी अर्जदारांकडे काही महत्त्वाची कागदपत्र असणं गरजेचं आहे. या कागदपत्रांमध्ये महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे ते म्हणजे डोमिसाईल प्रमाणपत्र. अर्जदारांकडे या गृहयोजनेसाठी 1 जानेवारी 2018 नंतर जारी करण्यात आलेलं आणि बारकोड असणारं महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र अर्थात डोमिसाईल सर्टिफिकेट सादर करणं आवश्यक आहे. या पुराव्याशिवाय अर्ज करणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो हेच या अटीमुळं आता स्पष्ट होत आहे. 


इतर महत्त्वाच्या अटी कोणत्या? 


म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताना अर्जदाराचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असणं बंधनकारक असेल. याशिवाय अर्जनोंदणी करत असताना अर्जदाराच्या डीजी लॉकर अॅपमध्ये त्यांच्यासह पती किंवा पत्नीचं आधार आणि पॅनकार्ड अपलोड करणंही गरजेचं आहे. म्हाडाच्या घरासाठी आवश्यक कागदपत्रांच्या पडताळणीसाठी हे पुरावे  महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतील. 


हेसुद्धा वाचा : MHADA Fake Website : एक ग्राफिक डिझायनर, एक शिक्षक अन् एक डेव्हलपर; अशी बनली स्वप्नांच्या घरांची बनावट वेबसाईट


 


लक्षात ठेवा... 


अर्जदार जर, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरांसाठी अर्ज करणार असतील तर, त्यांनी या योजनेच्या पोर्टलवर सर्वप्रथम नोंदणी करणं गरजेचं असणार आहे. नोंदणी नसल्यास म्हाडाकडून ही नोंदणी केली जाईल. इथं महत्त्वाची अट म्हणजे अर्जदाराचं वार्षिक उत्पन्न 6 लाखांहून कमी असालं आणि अर्जदार पती- पत्नीचं देशात इतर कुठंही पक्कं घर नसावं. 


म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताना अर्जदारानं उत्पन्नाचा पुरावा म्हणून 2023-24 वर्षासाठीचं आयकर विवरण पत्र सादर करावं. यावेळी आयकर खात्याचा पासवर्ड अर्जदाराला द्यावा लागणार आहे. यामध्ये इतरही महत्त्वाच्या गोष्टी असून अर्ज दाखल करताना अर्जदारांना त्या त्या अटींची पूर्तता करणं बंधनकारक असेल.