MHADA Lottery : 2030 घरांसाठी 70 हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? `या` दिवशी जाहीर होणार विजेत्यांची यादी
MHADA Lottery : हक्काचं आणि स्वप्नांचं घर मिळणार... उरले फक्त काही दिवस. म्हाडा लॉटरीसंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर. अर्ज भरललेल्यांनी लक्षपूर्वक वाचा...
MHADA Lottery : जीवनाच्या एका वळणावर आल्यानंतर हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते आणि या इच्छेपोटी बरीच मंडळी प्रचंड मेहनत करतात. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी हातभार लागतो तो म्हणजे म्हाडा आणि सिडकोसारख्या संस्थांचा. शहरातील महत्त्वाच्या भागांमध्ये गृहनिर्माण प्रकल्पांची निर्मिती करत तिथं सामान्यांना परवडणाऱ्या दरात घरं बांधून देण्याचं काम या संस्था करतात. अशा या महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण ( म्हाडा) च्या वतीनं काही दिवसांपूर्वीच मुंबईतील दोन हजारांहून अधिक घरांसाठीची सोडत जाहीर केली होती.
म्हाडाच्या 2030 घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी या सोडतीला कमाल प्रतिसाद दिला असून, आता तब्बल 70190 अर्जदारांनी ऑनलाईन अर्जनोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्याचं पाहायला मिळत आहे. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे म्हाडाच्या एका घरासाठी सरासरी 35 अर्ज आले आहेत. अर्ज नोंदणी प्रक्रियेची अंतिम तारीख अद्यापही आठवड्याभरानं दूर असल्यामुळं आता अर्जांची संख्या आणखी वाढणार असल्यामुळं म्हाडाची ही सोडत सर्वात विक्रमी ठरणार असा अंदाज नोंदवला जात आहे.
हेसुद्धा वाचा : मोठी बातमी! आता सातबारा उताऱ्यावरही लागणार आईचं नाव; 1 मे 2024नंतर जन्म झालेला असेल तर...
कधी जाहीर होणार विजेत्यांची यादी?
म्हाडाच्या सोडतीसाठी हजारोंच्या संख्येनं अर्ज आले असल्यामुळं आता यातून ज्यांच्या नावे घरं जाहीर होणार ती मंडळी खऱ्या अर्थानं नशीबवान आहेत असं म्हणणं गैर ठरणार नाही. म्हाडाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार 8 ऑक्टोबरला सोडतीतील विजेत्यांची यादी जाहीर होणार आहे. त्यामुळं आता स्वत:च्या घरासाठीचा तो क्षण फार दूर राहिलेला नाही, हेच खरं.
19 सप्टेंबरपर्यंत दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची मुभा असून, 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं सोडतीतील विजेत्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. म्हाडाच्या या सोजतीमध्ये 370 घरांच्या किमती 10 ते 25 टक्क्यांनी घटवल्यामुळं आता ही घरं आपल्या वाट्याला येतात का, याचीच उत्सुकता अर्जदारांमध्ये पाहायला मिळत आहे.
कोणत्या गटासाठी किती घरं?
अत्यल्प उप्तन्न गट - 359 घरं
अल्प उप्तन्न गट - 627 घरं
मध्यम उप्तन्न गट - 786 घरं
उच्च उप्तन्न गट - 276 घरं