MHADA lottery 2024 : हक्काच्या घरासाठी सामान्यांची कायमच धडपड सुरू असते. याच हक्काच्या घरासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेकांचाच शोध येऊन थांबतो तो म्हणजे म्हाडा आणि सिडकोच्या विविध गृहययोजनांवर. परवडणाऱ्यादरात शहराच्या विविध भागांमध्ये असणारी घरं. या घरांमध्ये मिळणाऱ्या सुविधा या साऱ्यामुळं म्हाडाच्या घरांना अनेकांची पसंती असते. यंदाही काही दिवसांपूर्वीच म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठीची योजना म्हाडानं जाहीर केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठ्या काळानंतर म्हाडानं मुंबईतील घरांसाठीची योजना जाहीर केल्यामुळं सामान्यांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. पण, या योजनेसाठी नोंदणी अर्ज करतेवेळी मात्र बऱ्याचजणांचा हिरमोड झाला. कारण ठरलं ते म्हणजे म्हाडाच्या घरांच्या चढ्या किमती. खिशाला परवडणाऱ्या दरात घरं नसल्याचं म्हणत मोठ्या संख्येनं इच्छुकांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर म्हाडानं या घरांच्या किमतीत काही प्रमाणात घट करत इच्छुकांना दिलासा दिला. 


मुंबईत अँन्टॉप हिल, पवई, कन्नमवार नगर विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड, दादर, लोअर परळ सोबतच गोरेगाव पश्चिम या परिसरांमध्ये असणाऱ्या विविध गृहप्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील साधारण 2030 घरं या योजनेत उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यांच्या दरात साधारण 10 ते 25 टक्क्यांची घट करण्यात आली आहे. 


कोणत्या गटातील आणि परिसरातील घरांच्या किमतीत घट? 


विकासकांडून मिळालेल्या 370 घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेत म्हाडानं अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमती 20 टक्क्यांनी, अत्यल्प गटातील घरांच्या किमती 25 टक्क्यांनी, मध्यम उत्पन्न गटातील घरांच्या किमती 15 तर उच्च गटातील घरांच्या किमतींमध्ये 10 टक्क्यांनी घट केली. 


हेसुद्धा वाचा : Ganesh Utsav 2024 : गणेशोत्सवासाठी रायगडमार्गे कोकण गाठणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; प्रवासादरम्यान... 


म्हाडाच्या निर्णयानुसार माझगावमधील अल्प उत्पन्न गटातील घराच्या किमती 62 वरून 50 लाखांवर आणल्या आहेत. तर, सांताक्रुझ येथे 72 लाखांचं घर आता 57 लाख रुपयांना असेल. विक्रोळीमध्ये 86 लाखांच्या घराची किंमत 70 लाख, तर कुर्ला येथील 88 लाखांचं घर 71 लाखात मिळेल. इथेच असणाऱ्या 37 लाखांच्या घराची किंमत 29 लाख रुपये इतकी असेल. 


अंधेरीतील घराची किंमत 1 कोटी 50 लाखांवरून 1 कोटी 18 लाखांवर आणण्यात आली आहे. तर, दादरमधील अल्प उत्पन्न गटासाठीच्या घराची किंमत 1 कोटी 62 लाखांवरुन 1 कोटी 30 लाख रुपये करण्यात आली आहे. तिथं मुलुंडमध्ये मध्यम उत्पन्न गटातील घराचे दर 1 कोटींवरून 88 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. बोरिवलीतील घराची किंमत 1 कोटींवरून 82 लाखांवर  पोहोचली आहे. चेंबूरमध्ये म्हाडाच्या अल्प उत्पन्न गटातील घराची किंमत 1 कोटींवरून 83 लाख रुपयांवर पोहोचली आहे.