MHADA Lottery latest update : स्वत:चं घर असावं अशी इच्छा असणाऱ्या अनेकांसाठीच म्हाडा म्हणजे एक मदतीचा हात ठरतो. किफायतशीर दरात अपेक्षित ठिकाणी गृहसंकुलं उपलब्ध करून देत आवक सावरून घर घेण्याचं सर्वसामान्यांचं स्वप्न याच म्हाडामुळं साकार होतं. अशा या म्हाडाकडून सातत्यानं सोडती जाहीर केल्या जातात. तुम्हीही म्हाडाचं घर खरेदी करण्याच्या विचारात आहात का? लक्षपूर्वक ही माहिती वाचा, कारण म्हाडा सोडतीसाठीची तुमची प्रतीक्षा वाढू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्हाडा कोकण मंडळाच्या 5311 घरांच्या सोडतीपैकी 2970 घरांसाठीची सोडत 13 डिसेंबर रोजी पार पडणार होती. यामधून प्रथम प्राधान्य योजनेतील घरं वगळण्यात येणार होती. पण, काही प्रशासकीय कारण देत ही सोडत पुढे ढकलण्यात आली. ज्यानंतर घराचं स्वप्न पाहणाऱ्यांच्या नजरा नव्या सोडतीकडे लागल्या पण, अद्याप सोडतीची नवीन तारीख मात्र जाहीर करण्यात आलेली नाही. ज्यामुळं आता एकदोन नव्हे, तब्बल 24 हजार अर्जदारांना या सोडतीच्या तारखेची प्रतीक्षा लागून राहिली आहे. 


अर्ज प्रक्रिया पार पडली आणि... 


कोकण मंडळाच्या सोडतीसाठी प्रथम प्राधान्य, पंतप्रधान आवास योजना, 15 टक्के एकात्मिक योजना, 20 टक्के सर्वसमावेशक योजना आणि म्हाडा गृहनिर्माण अशा योजनांमधील 5311 घरांसाठी 5 सप्टेंबर ते 17 नोव्हेंबर दरम्यान अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया पार पडली 


सोडतीमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यामधील 2000 हून जास्त घरं वगळता उर्वरित 2970 घरांसाठी 24 हजार अर्ज पात्र ठरले आहेत. निर्धारित वेळापत्रकानुसार डिसेंबरच्या मध्यापर्यंत सोडत जाहीर होणं अपेक्षित होतं. पण, डिसेंबरचा शेवटचा आठवडा सुरु होऊनही सोडतीची तारीख जाहीर झालेली नाही, ज्यामुळं अर्जदारांचा हिरमोड झाला आहे. इतकंच नव्हे, तर म्हाडाकडून सोडत पूर्व प्रक्रिया पूर्ण झाली असली तरीही सोडतीची तारीख जाहीर होत नाही, त्यामुळं आता नेमकी कोणती तारीख लक्षात ठेवायची हाच प्रश्न अर्जदार उपस्थित करताना दिसत आहेत. 


हेसुद्धा वाचा : सावध व्हा! कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंट संसर्गाचा वेग वाढला? 


 


सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोडत काढण्याचा निर्णय मंडळाने घेतला असून, येत्या काळात शक्य तितक्या लवकर ही सोडत जारी केली जाणार आहे. त्यामुळं आता अर्जदारांकडे वाट पाहण्यावाचून पर्याय नाही हेच खरं.