पुढच्या 5 वर्षात साध्य होणार हक्काच्या घराचं स्वप्न; MHADA ची परवडणाऱ्या घरांची योजना तुमच्यासाठीच
MHADA Lottery : आनंदाची बातमी... आता हक्काचं घरही घेता येणार आणि खिशाला परवडणाऱ्या दरामुळं खर्चाचा बोजाही नाही वाढणार. पाहा म्हाडाच्या घरांसंदर्भातील मोठी बातमी
MHADA Lottery : ठराविक वयात नोकरीला लागलेल्या अनेक मध्यमवर्गीयांचं ध्येय्य असतं ते म्हणजे स्वत:चं घर खरेदी करण्याचं. जीवनशैलीता स्तर उंचावण्यासाठी प्रयत्नशील असणारी ही सर्व मंडळी प्रचंड मेहनतीनं घरासाठी प्रयत्न करतात, पगारातील एक मोठी रक्कम घराच्या किमतीसाठी बाजूला काढतात. पण, बऱ्याचदा शहरातील मुख्य केंद्रांमध्ये भूखंडांचे वाढते दर आणि बांधकाम खर्चामध्ये होणाऱ्या वाढीमुळं सरतेशेवटी शहराबाहेरच घर खरेदीला प्राधान्य दिलं जातं. घरासाठी सातत्यानं धडपड करणाऱ्या या सर्व मंडळींसाठी म्हाडानं आता एक खात्रीशीर बातमी समोर आणत या सर्व इच्छुकांची चिंता मिटवली आहे.
केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या वतीनं मुंबई महानगर प्रदेशाची गृहनिर्माण क्षेत्रातील ग्रोथ हब म्हणून निवड करण्यात आली असून, या भागात 2030 पर्यंत म्हणजेच पुढील पाच वर्षांमध्ये या भागात सुमारे 30 लाखांहून अधिक घरांची उभारणी करण्याचा मानस बाळगण्यात आला आहे. यातील सुमारे 8 लाख घरांच्या उभारणीची जबाबदारी म्हाडानं घेतली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही घरं परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिली जाणार असल्यामुळं मध्यमवर्गीसाठी हा एक मोठा दिलासा ठरणार आहे. येत्या पाच वर्षांमध्ये नव्यानं घर खरेदीचा बेत असणाऱ्यांसाठी म्हाडाही ही योजना मोठ्या सहकार्याची सिद्ध होणार आहे.
मुंबईत एमएमआर ग्रोथ हब प्रकल्प या विषयावर म्हाडाकडूनच आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यशाळमध्ये म्हाडाचे उपाध्यक्ष संदीव जयस्वाल यांनी याविषयीचं वक्तव्य केलं. म्हाडाच्या मुंबई मंडळातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार इथं सुमारे 2 हजार हेक्टर जमीन म्हाडाच्या अख्तयारित असून, अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासातून अनेक घरं उपलब्ध होणार आहेत.
येत्या काळात गृहनिर्मितीला चालना देणार हे घटक...
पुनर्विकासासाठी अनेक पर्याय उपलब्ध असून, येत्या राळात गृहनिर्मितीला चालना मिळणार असल्याची माहिती या कार्यशाळेदरम्यान समोर आली. येत्या काळात घरांच्या किमती 30 टक्क्यांनी कमी करण्यासोबत समूह पुनर्विकासाला चालना देणं, अतिरिक्त सदनिका पुनर्विकासासाठी म्हाडाला देणं, दक्षिण मुंबईतील म्हाडाच्या इमारतींच्या पुनर्विकासाला वाव देणं या घटकांमुळं मुंबई मंडळातील गृहनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.
हेसुद्धा वाचा : 'त्या' भूमिकेसाठी अभिनेता झाला चालताफिरता सापळा? Trailed Video मध्ये अर्ध्या सेकंदाचं दृश्य पाहताच चाहते हडबडले
दरम्यान, दक्षिण मुंबई क्षेत्रामध्ये अनेक जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचे पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी म्हाडा कायद्यात आवश्यक बदल करण्यात आले असून, येत्या काळात इमारतींचा पुनर्विकास रखडणार नाही हेच म्हाडाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी बोलताना स्पष्ट केलं.