MHADA Lottery Latest Update : म्हाडाच्या घरांसाठी कैक इच्छुक जेव्हाजेव्हा जिथंजिथं सोडत येईल तेव्हातेव्हा आणि तिथंतिथं अर्ज दाखल करताना दिसतात. पण, आता मात्र याच इच्छुकांची प्रतीक्षा काहीशी लांबणीवर पडणार आहे. अपेक्षित ठिकाणी जर तुम्हीही म्हाडाच्या सोडतीची प्रतीक्षा करत असाल तर ही नवी अपहेट पाहाच. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी काळासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत लांबणीवर पडण्याची चिन्हं आहेत. अर्ज विक्री-स्वीकृतीला प्रतिसाद न मिळाल्यामुळं नाईलाजानं ही मुदतवाढी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या वतीनं 2264 घरांच्या सोडतीसाठी अर्जविक्री आणि अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पण, या योजनेला अर्जदारांकडून फार कमी प्रतिसाद मिळत असून, 1 महिना 10 दिवसांच्या कालावधीत अवघे 2514 अर्ज दाखल करण्यात आले आहे. 11 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबरदरम्यान 2264 घरांसाठी इतक्या कमी संख्येनं अर्ज दाखल करण्यात आल्यामुळं कोकण मंडळाची चिंता वाढली आहे. ज्यामुळं आता या गृहयोजनेत मुदतवाढ देण्याची वेळ गृहमंडळावर आली आहे. 


आतापर्यंत 2264 घरांसाठी फक्त 2514 अर्ज दाखल करण्यात आले असून, अर्जांची ही संख्या अतिशय कमी असल्यामुळं कोकण मंडळ अडचणीत आल्याचं स्पष्ट होत आहे. अर्जदारांची संख्या कमी असल्यामुळं ही संख्या वाढवण्यासाठी ही मुदतवात देत म्हाडानं घरांच्या विक्रीसाठी इच्छुकांना प्रोत्साहित करण्याता नवा आराखडा तयार केल्याचं पाहायला मिळत आहे. याचअंतर्गत सध्या उपलब्ध कैक माध्यमांतून या सोडतीच्या जाहिरातींना वाव दिला जाणार असून, जास्तीत जास्त इच्छुकांपर्यंत ही योजना पोहोचवण्याला म्हाडा प्राधान्य देणार आहे. 


हेसुद्धा वाचा : Mumbai News : गर्द जंगलातून जाणारी वाट अन् सोबतीला समुद्रकिनारा...; मुंबईत कुठे आहे ही तरंगती पायवाट? इथं पोहोचायचं तरी कसं? 


दरम्यान, येत्या काही दिवसांतच या मुदतवाढीची अधिकृत घोषणा केली जाईल, ज्यामुळं 27 डिसेंबर रोजी पूर्वनियोजित असणारी सोडत जाहीर होण्याची तारीखही पुढे जाण्याची स्पष्ट चिन्हं आहेत. एकिकडे म्हाडाच्या मुंबईतील घरांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असतानाच दुसरीकडे कोकण मंडळाला मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचच चित्र आहे. ज्यामुळं घरांच्या विक्री अभावी आता सोडतीची तारीख लांबणीवर पडणार आहे.