म्हाडाची लॉटरी फुटली; ९०१८ घरांची विक्रमी ऑनलाईन सोडत
ऑनलाईन सोडतीसाठी ५५,३२४ अर्ज होते वांद्र्याच्या गृहनिर्माण भवन या मुख्यालयात या सोडतीचे थेट वेब कास्टींग करण्यात आलं.
मुंबई: म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या ९०१८ घरांची विक्रमी ऑनलाईन सोडत पार पडली. ऑनलाईन सोडतीसाठी ५५,३२४ अर्ज होते वांद्र्याच्या गृहनिर्माण भवन या मुख्यालयात या सोडतीचे थेट वेब कास्टींग करण्यात आलं.
मान्यवरांच्या उपस्थितीत सोडत
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता,मुंबई उपनगर पालक मंत्री विनोद तावडे,गृहनिर्माण राज्य मंत्री रवींद्र वायकर,म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत पार पडली. या सोडतीत रंजन व्यास पहिली विजेती ठरली...द्वितीय विजेते-नरेंद्र सिंग पाटील ठरले तर तृतीय विजेती ठरली पौर्णिमा ठक्कर..
ऑक्टोबर- नोव्हेंबर मध्ये मुंबई मंडळाची लॉटरी
दरम्यान, ऑक्टोबर- नोव्हेंबर मध्ये मुंबई मंडळाची लॉटरी निघणार आहे...या लॉटरीत ९००ते १००० घर असणार आहेत.