Mhada News : अनेकांचं स्वप्न आहे मुंबई आणि पुण्यामध्ये आपलं हक्काचं घर असावं. पण अव्वा की सव्वा किंमतींमुळे सर्वसामान्यांचं हे स्वप्न पूर्ण होतं नाही. पण म्हाडा, सिडको लॉटरीतून हे स्वप्न पूर्ण होतं. म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरं मिळतात. म्हाडाकडून 4 हजार 82 घरांच्या सोडतीसाठी अर्ज नोंदणी करण्यात येतं आहे. जर तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर आजच्या आजच हे काम करा अन्यथा, तुम्ही घरापासून वंचित राहाल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे सोडत प्रक्रियेमध्ये अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्जदार ऑनलाइन अर्ज करु शकणार आहे. तर अनामत रकम रात्री 11.59 वाजेपर्यंत भरु शकणार आहेत. आतापर्यंत एक लाख दहा हजार अर्जदारांनी घरांसाठी अर्ज केले आहेत. यापैकी 40 टक्के लोकांनी गोरेगावमधील घरांना लोकांनी प्राधान्य दिलं आहे. गोरेगावमध्ये 2600 घरं आहेत. (mhada news today last day for application registration mhada lottery 2023 mumbai news  )


लहान घरं पण आशा मोठी 


यंदा म्हाडाकडून तयार करण्यात आलेल्या सदनिकांमधील घरांची किंमत 30 लाखांपासून 7 कोटींपर्यंत आहेत. अत्यंत निम्न वर्गातील 29.9 मीटर घरांची किंमत ही 30 लाख 44 हजार रुपये इतकी आहे, तर अल्पसंख्याक प्रवर्गातील 44.87 मीटर घरांची किंमत 45 लाख 86 हजारापर्यंत आहे. त्यामुळे गोरेगाव आणि विक्रोळीमध्ये सर्वाधिक लोकांनी पसंती दिली आहे. गोरेगावला सर्वाधिक पसंती मागे कारणं की, म्हाडाने प्रथमच या सदकिनांमध्ये जीम, स्विमिंग पूल, पार्किंगसह अनेक सुविधा दिल्या आहेत. अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे या सदनिका गोरेगाव रेल्वे स्थानक आणि मेट्रो स्टेशनपासून जवळ आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आलिशान घराकडे दुर्लक्ष 


तरदुसरीकडे आलिशान घरांकडे लोकांनी दुर्लक्ष केलं आहे. म्हाडाच्या या आलिशान आणि लक्झरी अपार्टमेंटची किंमत 1 कोटी ते 7 कोटी रुपयांपर्यंत आहे. या घरांसाठी अर्ज कमी प्रमाणात आले आहेत. त्यामुळे म्हाडाची निराशा झाली आहे. 


 


हेसुद्धा वाचा - मुंबईवर पाणीसंकट? धरणक्षेत्रात फक्त 23 टक्के पाणीसाठा


 


या अर्जांची सोडत वांद्रे पश्चिममधील रंगशारदा नाट्यगृहात काढण्यात येणार आहे, मात्र अद्याप तारीख आणि वेळ म्हाडाकडून जाहीर करण्यात आलेली नाही.