मुंबई : MHADA recruitment exam : घोटाळ्यानंतर रद्द झालेली म्हाडाची भरती परीक्षा होणार आहे. ही परीक्षा 29 जानेवारी ते 3 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.(MHADA recruitment exam will start from January 29, schedule announced)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑनलाइन पद्धतीने आणि ‘टीसीएस’च्या माध्यमातून म्हाडाची भरती परीक्षा होणार आहे. परीक्षेचे अंतिम वेळापत्रक म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. 29, 30 आणि 31 जानेवारी तसेच 1 ते 3 फेब्रुवारी रोजी परीक्षा होणार आहे.


म्हाडातील 144 पदांच्या 565 रिक्त जागा भरण्यासाठी 12 ते 20 डिसेंबरदरम्यान परीक्षा होणार होती. दोन लाखांपेक्षा जास्त अर्ज आले होते. मात्र परीक्षेला काही तास शिल्लक असताना, राज्य सरकारने ही परीक्षा रद्द केली होती. त्यामुळे परीक्षेला बसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. 


म्हाडा परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडण्यात आल्याचे पुढे आल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. दरम्यान, जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीच्या एका संचालकाने प्रश्नपत्रिका फोडण्याचा डाव आखला होता. पुणे सायबर पोलिसांनी कारवाई करून कंपनीच्या संचालकाला आणि दलालांना अटक केले. या प्रकारानंतर म्हाडाने परीक्षा घ्यावात असे सरकारने जाहीर केले. त्यानुसार म्हाडाने आता ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहे.