मुंबई : आपलं प्रत्येकाचं स्वत: आणि हक्काचं घर असावं असं स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्हाडातर्फे मुंबईतील गोरेगावच्या पहाडी भागात गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहे. या गृहप्रकल्पात पाच हजार घरांचा समावेश आहे.


आठवड्याभरात निविदा


मुंबईकरांना स्वस्तात आणि परवडणारी घरं मिळावी यासाठी म्हाडाने हा गृहप्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी आठवड्याभरात निविदा मागवण्यात येणार आहेत.


एकूण ५ हजार घरे


१८ एकर परिसरात बांधण्यात येणाऱ्या या गृहप्रकल्पात २ हजार ८५५ घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी, ९५२ घरे अल्प उत्पन्न गटासाठी तर, ७१५ घरे मध्यम उत्पन्न गटासाठी आणि उच्च उत्पन्न गटासाठी ५३७ घरे बांधण्यात येणार आहेत.


तीन वर्षांत प्रकल्प होणार पूर्ण


मुंबईतील गोरेगाव लिंक रोडवर बांधण्यात येणारा हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करणार असल्याचं म्हाडाने म्हटलं आहे. या प्रकल्पामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे.


एकूण दोन प्रकल्प बांधण्यात येणार


म्हाडातर्फे अ आणि ब असे दोन गृहनिर्माण प्रकल्प बांधण्यात येणार आहेत. अ गृहनिर्माण प्रकल्पात अत्यल्प उत्पन्न गटासाठी १ हजार ६६५ घरे, अल्प उत्पन्न गटासाठी ५५५ घरे, मध्यम उत्पन्न गटासाठी ४१७ घरे तर उच्च उत्पन्न गटासाठी ३१३ घरे बांधली जाणार आहेत.


यासोबतच ब गृहनिर्माण प्रकल्पात अत्यल्प उत्पन्न गटासाठी १ हजार १९० घरे, अल्प उत्पन्न गटासाठी ३९७ घरे, मध्यम उत्पन्न गटासाठी २९८ घरे आणि उच्च उत्पन्न गटासाठी २२४ घरे बांधण्यात येणार आहेत.