दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : म्हाडा, टीईटी परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आला असतानाच MIDC परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. MIDC भरती परीक्षेच्या निकालावरून संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काळ्या यादीत टाकलेल्या मे अ‍ॅपटेक लिमिटेड कंपनीकडून MIDC भरती परीक्षा घेण्यात आली. आधीच्या शासकीय भरती परीक्षेत कमी गुण मिळालेल्यांना एमआयडीसीच्या परीक्षेत भरघोस गुण मिळाले आहेत.


मुंबई महानगरपालिकेच्या भरती परीक्षेत ज्यांना १४, १६, २१, ३३ गुण मिळाले आहेत, त्याच उमेदवारांना एमआयडीसीच्या परीक्षेत मात्र ९९, १००, १९६ गुण मिळाले आहेत.


तसेच पालिकेची परीक्षा TCS ने घेतली होती. गुणांमधील हा मोठा फरक पाहता MIDC परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.


MIDC मधील ८६५ पदे भरण्यासाठी २०१९ जाहिरात काढण्यात आली. सहाय्यक अभियंता, लिपिक, टंकलेखक, कनिष्ठ अभियंता यासह अन्य पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. तसेच ही परीक्षा ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पार पडली आहे.


 MIDC परीक्षेत निकालानुसार निकालानुसार दोन उमेदवार असे आहेत. ज्यांना मुंबई महानगरपालिकेच्या परीक्षेत १५ गुण मिळाले होते, तर MIDC च्या परीक्षेत त्यांना ९९ गुण मिळाले आहेत.  हे दोन उमेदवार भाऊ-बहिण असून त्यांचे वडील मफलर मध्येच वरीष्ठ पदावर कार्यरत आहेत.


MPSC समन्वय समितीने या सर्व बाबी समोर आणल्या आहेत. यामुळे MIDC परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात आला आहे. एकाच कुटुंबातील दोन जणांनी MIDC परीक्षेत टॉप केल्याचेही दिसून येत आहे, एकाच कुटुंबातील अनेक नावे यात आहेत.