16 जूनपासून दूध दर होणार कमी
दुधाचे दर प्रती लिटर मागे चार रुपयांनी कमी होणार आहेत.
मुंबई : दुधाचे दर प्रती लिटर मागे चार रुपयांनी कमी होणार आहेत. राज्यातलया सोळा दुध संघांनी दूधाचा दर कमी करण्याचा निर्णय घेतलाय. सोळा जून पासून नवीन दर लागु होतील.
सध्या 42 रुपये असलेला दर 38 रुपये होईल. तर, 44 रुपयांचा दर 40 रुपयांवर येईल. फक्त गाईच्या दुधासाठी ही दर कपात असणार आहे.
या निर्णयामुळे इतर दुध संघही दर कपात करण्याची शक्यता आहे.
कुठल्या दूध संघांनी दूध स्वस्त केलंय?
सोनाई , ऊर्जा, स्वराज , गोविंद, आनंत , संतकृपा , किसान, माऊली , नॅचरल , शांताई , शिवप्रसाद , कन्हैया , नेचर , जे. डी. थोटे , गोशक्ती या दुध संघांनी दुध दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.