गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : मालाड विधानसभा मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार इस्लाम शेख यांनी काँग्रेसचे उमेदवार असलम शेख यांना मालवणीत आयोजित एका सभेत पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे मालाड विधानसभा मतदारसंघात महायुतीला मोठा दणका बसू शकतो. उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्रात मालाड विधानसभा ही एकमेव जागा गेली 10 वर्ष काँग्रेसकडे होती. त्यामुळे यंदा मालाड विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्याचा पूर्ण प्रयत्न भाजपने केला आहे. यासाठी भाजपने कांदिवली पूर्वचे काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार रमेश सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालाड मतदारसंघात मुस्लीम उमेदवारांची संख्या अधिक आहे. एमआयएम आणि काँग्रेस मध्ये एमआयएमची मते विभागली गेली असते तर याचा फायदा भाजपला झाला असता. एमआयएमने मुस्लीम भाग असलेल्या भागात आपले उमेदवार उभे केले आहेत. मालाड मतदारसंघात म्हणून एमआयएमने आपला उमेदवार दिला होते. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसच्या अडचणीत वाढल्या होत्या. पण आता एमआयएमने काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे मतांचे विभाजन होणार नाही. यामुळे अस्लम शेख यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.


येत्या 21 ऑक्टोबरला राज्यात मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे.