मुंबईतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंत्रीमहोदयांचा लोकलने प्रवास
सर्वसामान्य प्रवाशांसोबत संवाद साधत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सीएसटी ते मुलुंड असा लोकल प्रवास केला.
मुंबई: राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी लोकल ट्रेनने प्रवास केला. शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी त्यांनी रेल्वेचा पर्याय निवडला. राज्याला वीज पुरवठा करणाऱ्या कळवा येथे ''लो डिस्पॅच सेंटर''ची पाहणी करण्यासाठी आणि आढावा बैठकीच्या निमित्ताने उर्जामंत्री आले होते. रस्ते वाहतुकीमुळे लागणारा वेळ वाचवण्यासाठी त्यांनी लोकल प्रवास केला. सर्वसामान्य प्रवाशांसोबत संवाद साधत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सीएसटी ते मुलुंड असा लोकल प्रवास केला.