मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) उपनगरातील महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी पवई तलावाच्या लगत उभारण्यात येत असलेला 'सायकल आणि जॉगिंग ट्रॅक' प्रकल्प शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) बेकायदेशीर ठरवला.  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पवई तलावाच्या सभोवती सायकल ट्रँक उभारण्यात येतोय. या सायकल ट्रॅकला काल मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. न्यायालयाच्या निर्णयामुळे मुंबई पालिकेला मोठा धक्का बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तउच्च न्यायालयाच्या या निर्णया नंतर आता महाविकास आघाडीतीलच मंत्री जीतेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या पत्नी ऋता सामंत (Ruta Samant) यांनी ट्विट करून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आभार मानत स्वागत केलंय. 


ऋता आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, 'पवई लेक मधील सायकल ट्रॅक ला स्थगिती दिल्याबद्दल ऊच्च न्यायालयाचे आभार.
चुकीची गोष्ट कुणीही केली ती चुकीचीच असते.  सगळ्या पर्यावरण प्रेमींचं अभिनंदन..'  सरकारमधल्या मंत्र्याच्याच पत्नीने सरकारवर टीका केल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं राजकिय वर्तुळात बोललं जातं आहे.



प्रस्तावित प्रोजेक्टला विरोध
कोट्यवधी रुपये खर्च करून पवई व विहार तलावाजवळ सायकल ट्रॅक व जॉगिंग ट्रॅकची उभारणी होत आहे. पण महापालिकेतील विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला. त्यातच 'या प्रकल्पामुळे पवई तलावाचे पर्यावरणीय नुकसान होणार असून तलावातील जैवविविधतेलाही धक्का पोचणार आहे', अशी भीती व्यक्त केली गेली.