मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण आता ड्रग्ज प्रकरणात त्यांचे जावई समीर खान यांना एनसीबीचं समन्स बजावले आहे. करण सजनानीच्या चौकशीतून समीर खान यांचं नाव समोर आले होते. समीर खान हे NCB ऑफिसमध्ये चौकशीसाठी दाखल झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समीर खान आणि करण सजनानी यांच्यात 'गुगल पे'च्या माध्यमातून 20 हजार रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ड्रग्ज पुरवण्याच्या बदल्यात हा व्यवहार झाल्याचा एनसीबीला संशय आहे. त्याचसंदर्भात चौकशीसाठी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना बोलावण्यात आलं आहे. समीर हे नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे पती आहेत.


ड्रग्ज प्रकरणात याआधी मुंबईतील प्रसिद्ध 'मुच्छड पानवाला'चा मालक असलेला रामकुमार तिवारी याला एनसीबीने अटक केली होती. ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत अनेक मोठ्या लोकांची नावे पुढे आले असून अनेकांची आतापर्यंत एनसीबीकडून चौकशी झाली आहे. 


एनसीबीकडून आतापर्यंत अनेक मोठ्या सेलिब्रिटींची चौकशी झाली आहे. तर काही अजूनही एनसीबीच्या रडारवर आहेत. त्यातच यात नवाब मलिक यांच्या जावयाचं नाव आल्याने राज्याच्या राजकारणात आणखी एक खळबळ उडाली आहे.